सायबर वॉरियर्सकडून पथनाट्याद्वारे सायबर सुरक्षेबाबत जनजागृती
प्रतिनिधी:विनायक साबळे
वाघोली, २७ ऑगस्ट : JSPM University, Wagholi येथे विद्यार्थ्यांच्या ‘Cyber Warriors’ टीमतर्फे सायबर सुरक्षा आणि सुरक्षित डिजिटल व्यवहारांबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष Mass Cyber Awareness Activity [CyberVerse] आयोजित करण्यात आली. हा उपक्रम ‘Cyber Shiksha for Cyber Suraksha’ या अभियानांतर्गत Quick Heal Foundation आणि Maharashtra Cyber यांच्या सहकार्याने राबविण्यात आला.
सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्याचबरोबर विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आपल्या पथनाट्याच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांचे स्वरूप आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजना प्रभावीपणे मांडल्या.
पथनाट्यामध्ये एका व्यक्तीकडून चित्रपट डाउनलोड करण्यासाठी संशयास्पद वेबसाइटचा वापर केला जातो. त्यानंतर ऑनलाइन फसवणुकीमुळे त्याच्या खात्यातील पैसे गायब होतात, असा प्रसंग सादर करण्यात आला. या प्रसंगातून मोफत किंवा आकर्षक ऑनलाइन ऑफर्स, संशयास्पद वेबसाइट्स आणि अनोळखी लिंकच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे, असा संदेश देण्यात आला.
![]() |
यासोबतच विद्यार्थ्यांनी OTP Fraud, UPI Scam, Phishing Links, Fake Websites, Social Media Fraud आणि ऑनलाइन आर्थिक फसवणूक यांसारख्या सायबर गुन्ह्यांबाबत उपस्थितांना माहिती दिली. कोणत्याही अनोळखी व्यक्तीस OTP, PIN, CVV किंवा बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती देऊ नये, अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी आणि संशयास्पद वेबसाइटवर वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती भरू नये, असे आवाहन करण्यात आले.
पथनाट्याच्या माध्यमातून “सतर्क रहा, सुरक्षित रहा” हा संदेश विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे दिला. मनोरंजनासोबतच वास्तविक जीवनातील सायबर फसवणुकीचे प्रसंग सादर केल्यामुळे उपस्थितांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक असलेल्या डिजिटल साक्षरतेचे महत्त्व समजले.
या Mass Awareness Activity [ CyberVerse] मध्ये Cyber Warriors विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि सायबर सुरक्षेचा संदेश मोठ्या प्रमाणावर पोहोचविण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून जबाबदार, जागरूक आणि सुरक्षित डिजिटल समाज निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले.
‘Cyber Shiksha for Cyber Suraksha’ या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केवळ स्वतःमध्येच नव्हे, तर समाजामध्येही सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या उपक्रमाला उपस्थितांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
![]() |



Post a Comment
0 Comments