Type Here to Get Search Results !

शिरूर येथे जादूचे प्रयोग कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मनोरंजनातून शिक्षणाचा संदेश

 शिरूर येथे जादूचे प्रयोग कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मनोरंजनातून शिक्षणाचा संदेश


प्रतिनिधी:विनायक साबळे 


 श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळ, निमगाव म्हाळुंगी संचलित गुरुवर्य शंकरराव भुजबळ इंग्लिश मेडिअम स्कूल व सूर्यकांत पलांडे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्स, शिरूर यांच्या वतीने अरुण वाळुंज टॉक्स व्यासपीठ अंतर्गत "जादूचे प्रयोग - मनोरंजनातून शिक्षणाकडे" हा विशेष कार्यक्रम आज सकाळी १० वाजता उत्साहात संपन्न झाला. 


कार्यक्रमाचे उदघाटन गुरुवर्य शंकरराव भुजबळ इंग्लिश मेडिअम स्कूलच्या प्राचार्या.अंजुम पठाण व सूर्यकांत पलांडे ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या.योजना नाईकरे यांच्या शुभहस्ते पार पडले.


या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जादूगार रोहित कुमार चऱ्होलीकर यांनी आपल्या थरारक आणि चमत्कृतीपूर्ण जादूच्या प्रयोगांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. कबुतराची जादू, हातचलाखी, गायब होणे यांसारख्या अनेक प्रयोगांतून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कुतूहल निर्माण केले. जादू ही कोणतीही दैवी शक्ती नसून ती एक कला आणि विज्ञान आहे, हे त्यांनी प्रात्यक्षिकातून समजावून सांगितले.



 कार्यक्रमाचे संयोजन चित्रपट गीतकार. अरुण वाळुंज यांनी केले होते. यावेळी गीतकार अरुण वाळुंज यांनी सादर केलेल्या "राजे छत्रपती" हे गीत सादर केले. विद्यार्थ्यांनी गीताला छान प्रतिसाद दिला. शाळेच्या प्राचार्यांनी आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जादूगार रोहित कुमार, चित्रपट गीतकार.अरुण वाळुंज, मुख्य सहाय्यक.दिनेश पैठणे यांचा सत्कार केला.


मनोरंजनासोबतच शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवत जादूच्या प्रयोगाला मनसोक्त दाद दिली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. सुजाता दळवी यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षिका. प्रियंका जगनाडे , रुपाली चौधरी, अमृता जगताप , प्रतीक्षा गाडे, साक्षी घोडके , राधा खामकर, रेश्मा येवले, सुप्रिया भोगे, प्रीती घुमरे, ज्योती चापकरंडे ,वंदना थेऊरकर तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments