Type Here to Get Search Results !

विक्रमसिंह तापकीर उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित

 पुणे ग्रामीण पोलीस दलातील जिल्हा विशेष शाखेमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विक्रमसिंह पंडितराव तापकीर यांना नुकतेच पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या हस्ते उत्कृष्ट सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.


          पुणे ग्रामीण पोलीस दलातील जिल्हा विशेष शाखेमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विक्रमसिंह पंडितराव तापकीर यांनी चाकण औद्योगिक वसाहती मधील गुंडागिरी मोडीत काढण्यासाठी विशेष कामगिरी बजावत कोरोना काळात देखील विशेष कामगिरी केली होती, तर परराज्यातील विविध गुन्हेगारांना अटक केली असून पंजाब मधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपीला गुजरात येथून जेरबंद करण्यासाठी विशेष कामगिरी केली होती, त्यांच्या कार्याची दखल घेत शासनाच्या वतीने त्यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले असताना ते पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विक्रमसिंह तापकीर यांना उत्कृष्ट सेवा पदक प्रदान झाल्याने जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक कैलास खासबागे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश नलावडे, पोलीस हवलदार अनिल जगताप, विशाल साळुंखे, श्रीकांत चव्हाण, स्वप्निल गांडेकर यांसह आदींनी विक्रम सिंह तापकीर यांचे अभिनंदन केले आहे


.

Post a Comment

0 Comments