Type Here to Get Search Results !

डिंग्रजवाडीत दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद

 डिंग्रजवाडीत दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद


प्रतिनिधी:विनायक साबळे 


कोरेगाव भिमा : डिंग्रजवाडी (ता. शिरूर) परिसरात वारंवार दर्शन देत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्याने काही पशुधनांसह कुत्र्यांवर हल्ले केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.


डिंग्रजवाडी परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने तसेच पशुधन व कुत्र्यांवर हल्ले झाल्याने वनविभागाने खडावस्ती भागात पिंजरा लावला होता. अखेर बुधवारी सकाळच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला.


बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. वनविभागाच्या पथकाने बिबट्याला ताब्यात घेतले. पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या नर जातीचा असून पूर्ण वाढ झालेला आहे. त्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments