Type Here to Get Search Results !

दत्तविहारमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन

 दत्तविहारमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन


प्रतिनिधी:नितीन शिंदे 


 १५ वा वित्त आयोग पंचायत समिती हवेलीच्या माध्यमातून (५ लक्ष रुपये) आव्हाळवाडी येथील दत्तविहार वस्तीमध्ये नळ पाणीपुरवठा वितरण योजनेचे उद्घाटन करण्यात आले. या योजनेमुळे परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.


   या उद्घाटनप्रसंगी आमदार माऊली कटके,पंचायत समिती सभापती युवराज काकडे,उपसभापती विद्या गायकवाड,पंचायत समिती सदस्या सुषमा मुरकुटे,उपसरपंच अमोल आव्हाळे,मा.उपसरपंच प्रशांत सातव,पल्लवी आव्हाळे,सोनाली दाभाडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. वस्तीतील नागरिकांना नियमित व स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments