Type Here to Get Search Results !

शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! १३.६० लाखांच्या ३२ दुचाकी मूळ मालकांच्या ताब्यात; वाहनांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम

 शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई!

१३.६० लाखांच्या ३२ दुचाकी मूळ मालकांच्या ताब्यात; वाहनांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम


प्रतिनिधी : विनायक साबळे 


शिक्रापूर : गुन्ह्यांमध्ये जप्त झालेली, अपघातानंतर पोलिसांच्या ताब्यात आलेली तसेच बेवारस अवस्थेत वर्षानुवर्षे पडून असलेल्या वाहनांचा निपटारा करण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आरटीओ क्रमांक, चेसीस क्रमांक आणि इंजिन क्रमांकाच्या आधारे तपास करत पोलिसांनी तब्बल ३२ दुचाकींच्या मूळ मालकांचा शोध लावला असून, सुमारे १३ लाख ६० हजार रुपये किमतीची वाहने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मालकांच्या ताब्यात दिली आहेत.


शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या आवारात विविध गुन्ह्यांमध्ये जप्त झालेली, अपघातानंतर ताब्यात आलेली तसेच बेवारस अवस्थेत सापडलेली अनेक वाहने पडून होती. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारातील जागा व्यापली जात होती. तसेच अनेक वाहनमालक त्यांच्या वाहनांपासून वंचित होते.


ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी १० सप्टेंबरपासून विशेष मोहीम सुरू केली. वाहनांची माहिती संकलित करून आरटीओ क्रमांक, चेसीस क्रमांक व इंजिन क्रमांकाच्या आधारे वाहनमालकांचा शोध घेण्यात आला. संबंधित मालकांशी संपर्क साधून मालकीची खात्री करण्यात आली. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ३२ दुचाकी मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आल्या.


या कार्यवाहीमुळे वाहनमालकांना मोठा दिलासा मिळाला असून, पोलीस ठाण्याच्या आवारात पडून असलेल्या मुद्देमालाचा निपटारा करण्यासही मदत झाली आहे. गुन्ह्यांचा तपास करण्याबरोबरच जप्त वाहनांचा योग्य पद्धतीने निपटारा करून ती संबंधित मालकांपर्यंत पोहोचविण्याची कार्यवाही शिक्रापूर पोलिसांनी केली आहे.


दरम्यान, शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या आवारात अद्याप काही वाहने पडून आहेत. या वाहनांचे मूळ मालक किंवा कायदेशीर वारसदार असल्यास त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह शिक्रापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.


मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी कोणीही पुढे न आल्यास संबंधित वाहने नियमानुसार बेवारस समजून शासन स्तरावर कायदेशीर प्रक्रिया करण्यात येणार असून, त्यानंतर नियमानुसार वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.


३२ वाहनमालकांना मिळाला दिलासा


दिनकर सगाजी घोलप, रमेश नवले, किशोर लक्ष्मण दौंडकर, सचिन ढमढेरे, गणेश दत्तात्रय गावडे, लताबाई आरकस काळे, गणेश रूपचंद्र कोठारे, सुरेश परशुराम ढमढेरे, गणेश राजाराम कदम, धनंजय शिवाजी हारगुडे, अविंद रामचंद्र मोरे, शुध्दोधन ज्ञानदेव तेलगोटे, किशोर पदमाकर काकडे, विनोद दगडू जाधव, साफिया इमरान तांबोळी, सुनील चंदन शिवले, गणेश विश्वंभर साळुंखे, ऋषीकेश सुनील घोडके, शांताबाई भोसले, संतोष रघुनाथ लांडे, यासिन आब्दुल शेख, बाळासाहेब नारायण शिवाले, रंजित शिंदे, विजय चरचरे, जणाबाई टाकळकर, गणेश विजय तांबे, लक्ष्मण हजारे, सुयेश संतोष हिरवे, नयन किशोर मिस्वा, संभाजी बाबुराव बेउरकर, स्मिता निलेश लोणारे आणि मुंजाजी उर्फ राम कामाजी कदम या वाहनमालकांना त्यांची वाहने परत मिळाली आहेत.


ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार नवनाथ नाईकडे आणि अक्षदा पनमंद यांनी केली.


वाहनांबाबत अधिक माहितीसाठी संपर्क :

मुद्देमाल कारकून एन. डी. नाईकडे – ७५८८९४५३७०

विजय ओतारी – ९७४०८७७१९

Post a Comment

0 Comments