Type Here to Get Search Results !

जातेगाव बुद्रुकमध्ये विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त; कमी-जास्त दाबामुळे फ्रिज, टीव्ही, पंख्यांचे नुकसान; महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये नाराजी

 जातेगाव बुद्रुकमध्ये विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त;

कमी-जास्त दाबामुळे फ्रिज, टीव्ही, पंख्यांचे नुकसान; महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये नाराजी


प्रतिनिधी : विनायक साबळे 


शिक्रापूर : जातेगाव बुद्रुक परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे तसेच कमी-जास्त दाबाने वीजपुरवठा होण्याच्या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कमी होल्टेजमुळे फ्रिज, टीव्ही, पंखे यांसह विविध विद्युत उपकरणांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.


वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून, कमी-जास्त दाबामुळे विद्युत उपकरणे नादुरुस्त होऊन आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या गंभीर समस्येकडे महावितरणकडून अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.


दरम्यान, महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी जातेगाव बुद्रुक परिसरातील वीजपुरवठ्याची तातडीने पाहणी करून वारंवार होणारा वीजखंडितपणा तसेच कमी-जास्त दाबाची समस्या कायमस्वरूपी दूर करावी. तसेच विद्युत उपकरणांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments