Type Here to Get Search Results !

हवेली तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील 10 विद्यार्थ्यांची जागतिक इस्रो, नासा व युरोपियन स्पेस एजन्सी उपक्रमांसाठी निवड.

 हवेली तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील 10 विद्यार्थ्यांची जागतिक इस्रो, नासा व युरोपियन स्पेस एजन्सी उपक्रमांसाठी निवड.






प्रतिनिधी:विनायक साबळे
 

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी व त्यांना अंतराळ संशोधनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवून देण्यासाठी राबवण्यात आलेल्या विशेष निवड प्रक्रियेत, हवेली तालुक्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या प्रक्रियेतून हवेली तालुक्यातील एकूण १० विद्यार्थ्यांची जगातील अग्रगण्य अंतराळ संशोधन संस्थांच्या (नासा, इस्रो आणि युरोपियन स्पेस एजन्सी) अभ्यासदौऱ्यासाठी अंतिम निवड झाली आहे.


हवेलीतील निवड झालेले विद्यार्थी:


नासा (NASA - अमेरिका) भेटीसाठी (२ विद्यार्थी):

 कार्तिक सुधाकर वाळके (लोणीकंद)

 पार्थ विक्रम ताजणे (पेरणे)


इस्रो (ISRO - भारत) भेटीसाठी (६ विद्यार्थी):

ओम स्वप्नील यादव (लोणीकंद)

अनन्या सुनील देशमुख (लोणीकंद)

विश्वेशा विशाल ओहाळ (गाऊडदरा)

राधिका अतुल बोबडे (लोणीकंद)

सुहानी विलास चव्हाण (लोणीकंद)

अथर्व रामदास कंद (लोणीकंद)


युरोपियन स्पेस एजन्सी (ESA - युरोप) भेटीसाठी (२ विद्यार्थी):

श्रावणी बाळू आंबेकर (लोणीकंद)

सिद्धी सुभाष इंगळे (लोणीकंद)


निवड प्रक्रियेचे स्वरूप:

जिल्हा परिषदेच्या वतीने इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ही निवड प्रक्रिया तीन कठीण टप्प्यांत राबवली गेली:

१. पहिली चाचणी: संपूर्ण जिल्ह्यातून २३,६६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

२. दुसरी चाचणी: पहिल्या टप्प्यातून १,६६४ विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले.

३. अंतिम चाचणी (आयुका): 'आयुका' (IUCAA - आंतरविद्यापीठीय खगोलविज्ञान आणि खगोलभौतिकी केंद्र) मार्फत घेण्यात आलेल्या अंतिम चाचणीतून जिल्ह्यातील एकूण १०३ विद्यार्थ्यांची निवड झाली, ज्यामध्ये हवेलीतील १० विद्यार्थ्यांनी आपली जागा निश्चित केली.


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थेट जागतिक पातळीवरील अंतराळ संशोधन संस्थांना प्रत्यक्ष भेट देण्याची व तेथील संशोधन जवळून अनुभवण्याची ही दुर्मिळ संधी मिळाली आहे. या यशामुळे हवेली तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात, पालकवर्ग व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वोतपरी सहकार्य करणार असून, पुढील वर्षीच्या परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची निवड होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments