Type Here to Get Search Results !

कोरेगाव भीमात फिरत्या प्रयोगशाळेतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील श्री छत्रपती संभाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, विज्ञान विषयातील संकल्पना अधिक सुलभ, दृढ व कृतीयुक्त पद्धतीने समजाव्यात या उद्देशाने विज्ञान वाहिनी फिरती प्रयोगशाळा पुणे या संस्थेच्या माध्यमातून फिरत्या प्रयोगशाळेतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील श्री छत्रपती संभाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे विज्ञान वाहिनी फिरत्या प्रयोग शाळेतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमांतर्गत रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व जीवशास्त्र या विषयांतील विविध प्रयोग विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष करून दाखविण्यात आले, यावेळी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष रवींद्र फडतरे, बबुशा ढेरंगे, माजी सरपंच विजय गव्हाणे, प्राचार्य अनिल साकोरे, रामदास थिटे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते, दरम्यान सुवर्ण कांदळगावकर, ज्योती लोहटेकर, दत्तात्रय देवल, हेमा महाजन यांनी विविध आकृत्यांच्या माध्यमातून विषयातील महत्त्वाच्या संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट करून दिल्या तर यावेळी नशामुक्त भारत अभियानांतर्गत विकसित भारत की ओर एक सशक्त कदम या विषयावर देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत विज्ञान विषयातील संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून आत्मसात केल्या. तर यावेळी बोलताना विज्ञान वाहिनी फिरती प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील विविध संकल्पना प्रत्यक्ष प्रयोग व कृतीच्या माध्यमातून समजून घेण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि प्रयोगशीलता वाढण्यास निश्चितच मदत झाल्याचे मत प्राचार्य अनिल साकोरे यांनी व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments