![]() |
सणसवाडीतील सराटेवस्ती येथून आरोपी ताब्यात; चोरीची स्प्लेंडर प्लस दुचाकी हस्तगत
शिक्रापूर/विनायक साबळे : मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेत चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत केली. बिलिचदान जॉन्सन टोप्पो (रा. सराटेवस्ती, सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. झारखंड) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७१३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (एमएच २४ सीसी ९८३३) हस्तगत करण्यात आली.
चोरीस गेलेली दुचाकी आरोपीच्या ताब्यातून मिळाल्याने आरोपीसह मोटरसायकल पुढील कायदेशीर कारवाईसाठी शिक्रापूर पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरातील दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या तपासाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहायक पोलिस फौजदार संजय पड्याळ, पोलिस हवालदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, विकास पाटील आणि पोलिस अंमलदार सागर धुमाळ यांच्या पथकाने केली.

Post a Comment
0 Comments