Type Here to Get Search Results !

रांजणगावात तरुणावर चाकूहल्ला जुन्या वादातून डोक्यात चाकूने वार; तरुण गंभीर जखमी

 रांजणगावात तरुणावर चाकूहल्ला

जुन्या वादातून डोक्यात चाकूने वार; तरुण गंभीर जखमी


प्रतिनिधी : विनायक साबळे 


शिक्रापूर : रांजणगाव गणपती येथील सोने-सांगवी रोडवरील पार्किंगजवळ जुन्या भांडणाच्या वादातून शुभम गणेश पात्रे या तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची घटना सोमवारी (दि. १४) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात पात्रे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दीपक कचरू खौसे (रा. लोहद्रा, ता. वरुड, जि. अमरावती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीनुसार, खौसे याने पात्रे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस चाकूने वार केल्याचे नमूद करण्यात आले आहे.


या प्रकरणी संगमेश्वर विश्वनाथ बोबनाळे यांनी फिर्याद दिली आहे.


घटनेची माहिती मिळताच शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले व पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भापकर करीत आहेत.

Post a Comment

0 Comments